White अपुऱ्या कविता तुझ्यासाठी लिहलेल्या कित्येक कविता आजही राहिल्या आहे त्या अपुऱ्या चल भेटून आपण पुन्हा एकदा त्या अपुऱ्या कवितांना पूर्ण करूया मनात कोंडलेल्या त्या भावनांना चल आज शब्दांमध्ये फिरुया एक एक शब्दाला हळुवारपणे तळहातावर उचलून आपण ठेऊया रुसवे फुगवे हसू सगळं कही चल आपण शब्दांना सोबत मांडूया आणि शब्द मांडता मांडता एक मेकांना समोर ठेऊन भांडूया कवितेच्या अर्धवट ओळींना घेऊन चल ना गं आपण एकदा भेटूया तुझ्यासाठी लिहलेल्या कवितांना चल आज खरंच पूर्ण करूया तुझी माझी ओळख खरं तर ह्या कविते पासूनच आहे म्हणून ह्या अपुऱ्या कवितेंना आजही माझ्याकडे जपूनच आहे ©Rashi Apurya Kavita #Aathwani #athwan #MarathiKavita #marathi #kavita #emotional #RakeshShinde