तुला कसं जमलं राधेला सोडणं देवा मला तर हे जमणार नाही राधेलाच रुक्मिणी बनवायचंय मला कारण,तिच्याशिवाय मला कधीच गमणार नाही... तुला जमलं ना विरहात जगणं मला तर ती दुसऱ्याची होताना बघवणार नाही हा राहील जर माझ्यासाठी लग्नाविना वाट बघत माझी तर मी सुद्धा दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करणार नाही... जोडलं जर त्यानं तर मार्ग ही तोच दाखवेल ना एकमेकांशिवाय खरंच आम्हाला राहवणार नाही शेवटी राहणार असंच वाट बघत तिची आयुष्यभर कारण,तर विरह सहन करत आम्ही एकमेकांशिवाय जगणार नाही... तिच्या मनातलं सांगता नाही येणार मला तसं तर परंतु मला तर तिच्याशिवाय जगताच येणार नाही आणि नशिबानं झालोच तर कायमचे एकत्र आम्ही तर पकडलेला हात मरेपर्यंत सोडता येणार नाही.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_quotes quotes on love one sided love shayari love quotes love shayari