Nojoto: Largest Storytelling Platform

चेहरा   माणसाचा चेहरा पाहता नाही इथे कसला भरव



चेहरा

 

माणसाचा चेहरा पाहता

नाही इथे कसला भरवसा,

त्याला पाहताना

हसतो पहा आरसा.

 

फसतात सारे इथे

रंग पाहून माणसाचे,

ना खरे ना खोटे

कळे अंतरंग चेहऱ्याचे.

 

जीवनाचा आज इथे

खरा तमाशा झाला,

पण राजू तुला माणसातला

माणूस नाही कळला.

 

राजेंद्रकुमार शेळके.

                               नारायणगाव,पुणे.

©Rajendrakumar Shelke
  चेहरा

चेहरा #Poetry

36 Views