Nojoto: Largest Storytelling Platform

*कांतीचा शिंगार...(लावणी)* ***********************

*कांतीचा शिंगार...(लावणी)*
**************************
शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 जीव झालाया किती अधीर
या ना लवकर नको उशीर
तुम्हासाठी नजर भिरभीरं
तुमच्या बाहुत साजणा झुलवा।।१।।
माझ्या यौवनाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 नटले सजले मी दिलवरासाठी
बोलवी तुम्हास माझी ही मिठी
शिंगार उधानला या रातीसाठी
कोडं प्रेमाचं तुमीच हो सोडवा।।२।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
हात धरता चमके देहात ईज
हरवलीया राया रातीची नीज
करा हो तुम्ही भेटीची तजवीज
रात सरतीया ही चला श्रींगार घडवा।।३।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
उभार अंगाचे मोहरून आले
तनामनावर शिंगार ल्याले
भाव व्याकुळ भरात हे आले
येऊन चाखवा इष्काचा गोडवा।।४।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।
     *रोहिणी पांडे,नांदेड*
        *दि.२०.९.२०१९* *कांतीचा शिंगार...(लावणी)*

शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 जीव झालाया किती अधीर
*कांतीचा शिंगार...(लावणी)*
**************************
शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 जीव झालाया किती अधीर
या ना लवकर नको उशीर
तुम्हासाठी नजर भिरभीरं
तुमच्या बाहुत साजणा झुलवा।।१।।
माझ्या यौवनाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 नटले सजले मी दिलवरासाठी
बोलवी तुम्हास माझी ही मिठी
शिंगार उधानला या रातीसाठी
कोडं प्रेमाचं तुमीच हो सोडवा।।२।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
हात धरता चमके देहात ईज
हरवलीया राया रातीची नीज
करा हो तुम्ही भेटीची तजवीज
रात सरतीया ही चला श्रींगार घडवा।।३।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
उभार अंगाचे मोहरून आले
तनामनावर शिंगार ल्याले
भाव व्याकुळ भरात हे आले
येऊन चाखवा इष्काचा गोडवा।।४।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।
     *रोहिणी पांडे,नांदेड*
        *दि.२०.९.२०१९* *कांतीचा शिंगार...(लावणी)*

शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 जीव झालाया किती अधीर
rohinipande5001

Rohini Pande

New Creator