White न्याहाळला मी चंद्र आज तुझ्या साक्षीने, तोही चंद्र कोरीप्रमाणे फुलू पाहत होता.. जणू आठवणीत कोणी असावं कोणाच्या, असं तो त्या चांदण्यांना सांगू पाहत होता... तारकांनी भरलेलं आकाश सारं, पडला होता लख्ख काळोख.. चांदण्याही झाल्या स्तब्ध, पाहण्या तुला न मला सलोखं... कुशीत निजली वसुंधरा, अन् पांघरले हे निळे आकाश.. झोका घेत अल्लड वारा, निजवितो तुला सावकाश... कधी तरी तुझ्यासवे वाटे, असावी ही निरव शांतता.. बोलतांना मोजता यावी, तुझ्या डोळ्यातली ती स्तब्धता... #RIद्धी ✒️ . ©Dipesh Gulekar #love_shayari