Nojoto: Largest Storytelling Platform

जगण्याचा हुरूप टिकून राहतो... -विष्ण

 जगण्याचा हुरूप टिकून राहतो...
              -विष्णू थोरे,चांदवड.
                ९३२५१९७७८१   
         
  रिकाम्या हातांना काम हवं. हात कलासक्त असतात. या हातांनी दोस्तीचे किती हात घेतले हातात आणि आपण हातोहात सर्वांचे आवडते होत गेलो. काही हातांनी झिडकारलंही,म्हणून आपले हात कधी उदास झाले नाही. प्रांजळ होऊन हात ओंजळीत झेलत राहिले सुख दु:खाचं ऊन. मायेची सावली ज्यांच्या ओंजळीत सांडली त्यांचेच हात समृद्ध झाले. जगणं हागण्यासारखं विसरून गेलेली माणसाची एक जमात मी पाहिली जवळून. तेव्हा खूप दु:खं झालं. तेव्हा याच हातांनी त्यांना तिलांजली दिली.  
        चौकीवरचा मारुती रंगवत होतो. भयंकर ऊन. मारुतीरायाच्या डोक्यावर छपर नव्हतं. लंका दहन करून आल्यावर मारुतीरायाने शेप पाण्यात बुडवून विझवली. आणि घाम पुसून पाण्यात फेकला. तो घाम एका मगरीने गिळला आणि तिला दिवस गेले. त्यापासून मगरीला पुत्र झाला. हा किस्सा मुद्दाम आठवत होता रंगवता रंगवता. कारण उन्हात इकडं माझ्या घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या. मारुतीरायामुळं घामात किती पॉवर असते हे कळलं. त्यामुळे मी तो हाताने पुसून शिंपडत नव्हतो. मी तो शर्टाच्या बाहीलाच पुसत होतो. बाही ओली झाली होती. एखादी वाऱ्याची झुळूक चोरून आली की गार वाटायचं. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. ऐश्वर्य चांदवडला आलेला. मी त्याला तिकडेच बोलावून घेतलं. बाजूच्या निंबाच्या सावलीत बसून तो आवाक होवून बघत राहिला. म्हटला अरे काय काय कामं करतोस. माझे एटीडी झालेले चित्रकार मित्र मला नेहमी फोन करतात. कामं नाही,नौकरी नाही म्हणून ते खूप हताश असतात. मी त्यांना तुझं उदाहरण देतो. शिकून मोठं झालं की असली कामं त्यांना प्रतिष्ठेची वाटत नाहीत म्हणून ती कामं करायची त्यांना लाज वाटते. चार पैसे मिळत असतील तर आनंदाने कुठलंही काम करावं त्यानं जगण्याचा हुरूप टिकून राहतो.’ डिजिटल युगात कलावंतांवर मोठी परवड आली. तरीही कलावंताच्या वाटयाला येणारी खूप कामं असतात जी यंत्राने होत नाहीत. फक्त मोठेपणा बाजूला ठेवून काम करता आलं पाहिजे. कामाची प्रतवारी करत बसलात की पत ढासळत जाते. ऐश्वर्यने संग्रहाची डीटीपी केलेली प्रत दिली हातात. म्हणाला या संग्रहाचं मुखपृष्ठ करायचंय तुला. शब्दालय करतंय पुस्तक .मला आनंद झाला.       
      ऐश्वर्यची कविता वाचत होतो. ऐकत होतो. बऱ्याच कविता पाठही होत्या. त्याच्या कवितेतल्या दुख , वेदना, जाणिवा परिचयाच्या होत्या. मी आवड म्हणून दोन पुस्तकांची मुखपृष्ठ केली होती. चित्रकार म्हणून नावारूपाला नव्हतो.ऐश्वर्य मात्र कवितेमुळे महाराष्ट्रभर माहित होता. मग मला धाक पडला. आधीच ऐश्वर्यचं मुखपृष्ठ करण्यासाठी चांगले चांगले चित्रकार स्वतःच तयार होते.पण याने जाणीवपूर्वक मला काम दिलं. ‘भुईशास्र’ हे शीर्षक ठरलं होतं. दोनदा तीनदा वाचून काढलं. मध्ये काही विभाग होते. त्याची रेखाटणे केली. मुखपृष्ठावर काय घ्यायचं हा मनातला गुंता काही सुटत नव्हता.पण संग्रहातली एक कविता सारखी मनात रेंगाळत होती. पावसाचे दिवस होते.बाहेर मुसळधार पाऊस चालू. लाईट गेलेली अन चित्र काढायला जाम मूढ आला. मग चिमणीच्या उजेडात मी रंग,कागद घेवून बसलो.ऐश्वर्यच्या कवितेतला माणूसरुपी बैल मनाच्या कॅनव्हासवर डरकाळ्या मारत होता. त्याला पडण्यासाठी माझी धडपड सुरु होती. तीन चार कागदं फाडून फेकली. मग माणसासारखा दिसणारा एक तरणाबांड बैल कागदावर उभा राहिला. हातात नांगर घेवून. त्याला पाय नाहीच. तरीही त्याची धावण्याची उमेद राजबिंडी.शिंग नुकतेच फुटले आहेत. व्यवस्थेला ढुशा दयायला ते पर्याप्त आहेत. अंगावर मातकट रंग आहे. कुस्तीतल्या पैलवाना सारखा. नुकताच अंगाला माती लावून उठलेला. काळा रंग मला फार आवडतो. कितीही टाळायचं म्हटलं तरी तो येतोच चित्रात. लहानपणी भिंतीवरच्या काळ्या सावल्याही अशाच भुरळ घालायच्या.त्यांचे आकार उकार मनाच्या मुक्या विकारासारखे वाटायचे. दुखाची सावलीही काळीच असते. लख्ख व्हायचं असेल तर गर्द काळ्या पार्श्वभूमीशिवाय पर्याय नाही. ऐश्वर्यच्या कवितेतही दुखाची गर्द पण भरजरी किनार आहे आणि नायक म्हणून दुखाला ढुशा देत तो ऐटीत जगत होता. हे त्याच्या चेहऱ्यावरच्या निरागस हसण्यात लख्खं व्हायचं. मग बैलाच्या पाठीमागचा भाग मी काळाच दाखवला. चित्र हे आपल्या जगण्याचं विचित्र रूप असतं.त्यात सौंदर्य निर्माण करण्याची किमया तेवढी आपल्याला करावी लागते. ‘भुईशास्र’ मुळे मला ती करता आली.रात्री बारा वाजता मी ऐश्वर्यला फोन केला. म्हटलं चित्र तयार झालं. तो म्हणाला, ‘इतक्या उशिरा फोन करतोय म्हणजे नक्कीच भन्नाट झालं असणार !’ अन खरोखरच मी काढलेलं मुखपृष्ठ त्याला आवडलं होतं. संग्रह यथावकाश प्रकाशित झाला. त्याची चर्चा सुरु झाली. आणि एके दिवशी अचानक बातमी आली..ऐश्वर्य पाटेकर यांना साहित्य अकादमीचा पहिला युवा पुरस्कार जाहीर...फावडे घेवून रानाकडे निघणारच होतो..तेवढयात दावणीला बांधलेल्या आमच्या बैलाकडे लक्ष गेलं. त्याच्या जवळ जावून मी त्याला हळुवारपणे कुरवाळलं.

nojotouser6882375737

vishnu thore

New Creator

जगण्याचा हुरूप टिकून राहतो... -विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ रिकाम्या हातांना काम हवं. हात कलासक्त असतात. या हातांनी दोस्तीचे किती हात घेतले हातात आणि आपण हातोहात सर्वांचे आवडते होत गेलो. काही हातांनी झिडकारलंही,म्हणून आपले हात कधी उदास झाले नाही. प्रांजळ होऊन हात ओंजळीत झेलत राहिले सुख दु:खाचं ऊन. मायेची सावली ज्यांच्या ओंजळीत सांडली त्यांचेच हात समृद्ध झाले. जगणं हागण्यासारखं विसरून गेलेली माणसाची एक जमात मी पाहिली जवळून. तेव्हा खूप दु:खं झालं. तेव्हा याच हातांनी त्यांना तिलांजली दिली. चौकीवरचा मारुती रंगवत होतो. भयंकर ऊन. मारुतीरायाच्या डोक्यावर छपर नव्हतं. लंका दहन करून आल्यावर मारुतीरायाने शेप पाण्यात बुडवून विझवली. आणि घाम पुसून पाण्यात फेकला. तो घाम एका मगरीने गिळला आणि तिला दिवस गेले. त्यापासून मगरीला पुत्र झाला. हा किस्सा मुद्दाम आठवत होता रंगवता रंगवता. कारण उन्हात इकडं माझ्या घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या. मारुतीरायामुळं घामात किती पॉवर असते हे कळलं. त्यामुळे मी तो हाताने पुसून शिंपडत नव्हतो. मी तो शर्टाच्या बाहीलाच पुसत होतो. बाही ओली झाली होती. एखादी वाऱ्याची झुळूक चोरून आली की गार वाटायचं. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. ऐश्वर्य चांदवडला आलेला. मी त्याला तिकडेच बोलावून घेतलं. बाजूच्या निंबाच्या सावलीत बसून तो आवाक होवून बघत राहिला. म्हटला अरे काय काय कामं करतोस. माझे एटीडी झालेले चित्रकार मित्र मला नेहमी फोन करतात. कामं नाही,नौकरी नाही म्हणून ते खूप हताश असतात. मी त्यांना तुझं उदाहरण देतो. शिकून मोठं झालं की असली कामं त्यांना प्रतिष्ठेची वाटत नाहीत म्हणून ती कामं करायची त्यांना लाज वाटते. चार पैसे मिळत असतील तर आनंदाने कुठलंही काम करावं त्यानं जगण्याचा हुरूप टिकून राहतो.’ डिजिटल युगात कलावंतांवर मोठी परवड आली. तरीही कलावंताच्या वाटयाला येणारी खूप कामं असतात जी यंत्राने होत नाहीत. फक्त मोठेपणा बाजूला ठेवून काम करता आलं पाहिजे. कामाची प्रतवारी करत बसलात की पत ढासळत जाते. ऐश्वर्यने संग्रहाची डीटीपी केलेली प्रत दिली हातात. म्हणाला या संग्रहाचं मुखपृष्ठ करायचंय तुला. शब्दालय करतंय पुस्तक .मला आनंद झाला. ऐश्वर्यची कविता वाचत होतो. ऐकत होतो. बऱ्याच कविता पाठही होत्या. त्याच्या कवितेतल्या दुख , वेदना, जाणिवा परिचयाच्या होत्या. मी आवड म्हणून दोन पुस्तकांची मुखपृष्ठ केली होती. चित्रकार म्हणून नावारूपाला नव्हतो.ऐश्वर्य मात्र कवितेमुळे महाराष्ट्रभर माहित होता. मग मला धाक पडला. आधीच ऐश्वर्यचं मुखपृष्ठ करण्यासाठी चांगले चांगले चित्रकार स्वतःच तयार होते.पण याने जाणीवपूर्वक मला काम दिलं. ‘भुईशास्र’ हे शीर्षक ठरलं होतं. दोनदा तीनदा वाचून काढलं. मध्ये काही विभाग होते. त्याची रेखाटणे केली. मुखपृष्ठावर काय घ्यायचं हा मनातला गुंता काही सुटत नव्हता.पण संग्रहातली एक कविता सारखी मनात रेंगाळत होती. पावसाचे दिवस होते.बाहेर मुसळधार पाऊस चालू. लाईट गेलेली अन चित्र काढायला जाम मूढ आला. मग चिमणीच्या उजेडात मी रंग,कागद घेवून बसलो.ऐश्वर्यच्या कवितेतला माणूसरुपी बैल मनाच्या कॅनव्हासवर डरकाळ्या मारत होता. त्याला पडण्यासाठी माझी धडपड सुरु होती. तीन चार कागदं फाडून फेकली. मग माणसासारखा दिसणारा एक तरणाबांड बैल कागदावर उभा राहिला. हातात नांगर घेवून. त्याला पाय नाहीच. तरीही त्याची धावण्याची उमेद राजबिंडी.शिंग नुकतेच फुटले आहेत. व्यवस्थेला ढुशा दयायला ते पर्याप्त आहेत. अंगावर मातकट रंग आहे. कुस्तीतल्या पैलवाना सारखा. नुकताच अंगाला माती लावून उठलेला. काळा रंग मला फार आवडतो. कितीही टाळायचं म्हटलं तरी तो येतोच चित्रात. लहानपणी भिंतीवरच्या काळ्या सावल्याही अशाच भुरळ घालायच्या.त्यांचे आकार उकार मनाच्या मुक्या विकारासारखे वाटायचे. दुखाची सावलीही काळीच असते. लख्ख व्हायचं असेल तर गर्द काळ्या पार्श्वभूमीशिवाय पर्याय नाही. ऐश्वर्यच्या कवितेतही दुखाची गर्द पण भरजरी किनार आहे आणि नायक म्हणून दुखाला ढुशा देत तो ऐटीत जगत होता. हे त्याच्या चेहऱ्यावरच्या निरागस हसण्यात लख्खं व्हायचं. मग बैलाच्या पाठीमागचा भाग मी काळाच दाखवला. चित्र हे आपल्या जगण्याचं विचित्र रूप असतं.त्यात सौंदर्य निर्माण करण्याची किमया तेवढी आपल्याला करावी लागते. ‘भुईशास्र’ मुळे मला ती करता आली.रात्री बारा वाजता मी ऐश्वर्यला फोन केला. म्हटलं चित्र तयार झालं. तो म्हणाला, ‘इतक्या उशिरा फोन करतोय म्हणजे नक्कीच भन्नाट झालं असणार !’ अन खरोखरच मी काढलेलं मुखपृष्ठ त्याला आवडलं होतं. संग्रह यथावकाश प्रकाशित झाला. त्याची चर्चा सुरु झाली. आणि एके दिवशी अचानक बातमी आली..ऐश्वर्य पाटेकर यांना साहित्य अकादमीचा पहिला युवा पुरस्कार जाहीर...फावडे घेवून रानाकडे निघणारच होतो..तेवढयात दावणीला बांधलेल्या आमच्या बैलाकडे लक्ष गेलं. त्याच्या जवळ जावून मी त्याला हळुवारपणे कुरवाळलं. #nojotophoto