Nojoto: Largest Storytelling Platform

!!प्रेमाचा उजेड!! आयुष्यात आलास तू प्रेमाचा उजेड

!!प्रेमाचा उजेड!!

आयुष्यात आलास तू 
प्रेमाचा उजेड घेऊनी 
मी ना माझी राहिले
गेले तुझीच होऊनी !!

निःस्वार्थ प्रेमाचा सागर तू
त्या सागराचा किनारा मी
तुझ्या हृदयीच्या भावनांचा
गार मोकार वारा मी !!

भांडतो तु तुझ्या मनाशी
प्रेम सारे हृदयी कोंडून 
मला जपतो काळजात 
अबोल प्रेम मनात साठवून !!

भाव सारे त्या हृदयीचे
या हृदयाला केव्हाच कळले
जरी अवक्त प्रेम तुझे 
त्या प्रेमाला मन माझे भुलले !!

जोडलेल्या या रेशीमगाठी
काळजात जपून ठेऊ
मी तुल अन् तू मला
थोडे थोडे समजून घेऊ !!

तुझ्या माझ्या डोई आता
ओझे आहे कर्तव्याचे
देऊ साथ एकमेका
मनी बंध जपू प्रेमाचे !! उजेड प्रेमाचा#मराठी कविता#
!!प्रेमाचा उजेड!!

आयुष्यात आलास तू 
प्रेमाचा उजेड घेऊनी 
मी ना माझी राहिले
गेले तुझीच होऊनी !!

निःस्वार्थ प्रेमाचा सागर तू
त्या सागराचा किनारा मी
तुझ्या हृदयीच्या भावनांचा
गार मोकार वारा मी !!

भांडतो तु तुझ्या मनाशी
प्रेम सारे हृदयी कोंडून 
मला जपतो काळजात 
अबोल प्रेम मनात साठवून !!

भाव सारे त्या हृदयीचे
या हृदयाला केव्हाच कळले
जरी अवक्त प्रेम तुझे 
त्या प्रेमाला मन माझे भुलले !!

जोडलेल्या या रेशीमगाठी
काळजात जपून ठेऊ
मी तुल अन् तू मला
थोडे थोडे समजून घेऊ !!

तुझ्या माझ्या डोई आता
ओझे आहे कर्तव्याचे
देऊ साथ एकमेका
मनी बंध जपू प्रेमाचे !! उजेड प्रेमाचा#मराठी कविता#
vaishali6734

vaishali

New Creator

उजेड प्रेमाचामराठी कविता#