Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्रिण रोशनीच्या पप्पांना भावपूर्ण आदरांजली म्हण

मैत्रिण रोशनीच्या पप्पांना भावपूर्ण आदरांजली
 म्हणून पप्पांची परी ही कविता समर्पित 💐🙏

पप्पांची परी

छोटीशी परी होती ती नकोशी 
सोसलं दुःख तीनं आईच्या कुशी 
चौथी मुलगी नांव तीच रोशनी
धाक साऱ्यांचा, चेहऱ्यावर खुशी 

खेळाची, डान्सची बक्षिसं मिळाली
गुणांनी तिच्या लाडकी ती झाली 
अंधारात झाली हो पप्पांची काठी 
सायकलवर कितीदा सोडवायला आली 

घराबाहेर जाणं म्हणजे होता गुन्हा 
पप्पांनी हळवं होवून ऍडमिशन केली 
लग्नासाठी जमवलेल धन खर्च करून 
शिक्षणातून संस्कारांचे लेणं मात्र दिले 

आज परी पप्पांच नांव रोशन करते आहे 
आईच्या कुशीत आठवण त्यांची काढते आहे
दिवस रात्र मेहनतीने पप्पांनी बांधलेले घर 
पप्पांच्या रोशनीला जणू सांभाळते आहे 

कवी पंडित निंबाळकर

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar 
#sadpoem 
#pappanchipari
मैत्रिण रोशनीच्या पप्पांना भावपूर्ण आदरांजली
 म्हणून पप्पांची परी ही कविता समर्पित 💐🙏

पप्पांची परी

छोटीशी परी होती ती नकोशी 
सोसलं दुःख तीनं आईच्या कुशी 
चौथी मुलगी नांव तीच रोशनी
धाक साऱ्यांचा, चेहऱ्यावर खुशी 

खेळाची, डान्सची बक्षिसं मिळाली
गुणांनी तिच्या लाडकी ती झाली 
अंधारात झाली हो पप्पांची काठी 
सायकलवर कितीदा सोडवायला आली 

घराबाहेर जाणं म्हणजे होता गुन्हा 
पप्पांनी हळवं होवून ऍडमिशन केली 
लग्नासाठी जमवलेल धन खर्च करून 
शिक्षणातून संस्कारांचे लेणं मात्र दिले 

आज परी पप्पांच नांव रोशन करते आहे 
आईच्या कुशीत आठवण त्यांची काढते आहे
दिवस रात्र मेहनतीने पप्पांनी बांधलेले घर 
पप्पांच्या रोशनीला जणू सांभाळते आहे 

कवी पंडित निंबाळकर

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar 
#sadpoem 
#pappanchipari