Nojoto: Largest Storytelling Platform

काका तुमचं किती नुकसान झालं? विचारलं, इतरांना विच

काका तुमचं किती नुकसान झालं?

विचारलं, इतरांना विचारावं तसच...
तसं इतरांपेक्षा काही वेगळा भाव नव्हताच... 
त्यांनी सांगितलं,
त्यांनीं सांगितल
नेल बाबा माझ सारं उभं पीक वाहून
मालकिनीचा सणांचा हुरूपच गेला हे सगळं पाहून
 पोरांच्या अभ्यासासाठी माराय लागणारा बॅलन्स...
 गुराढोरांचा चारा...
 म्हातारीचं मोतीबिंदू आप्रेशन...
गेलं समदच पुन्हा राहून.!

हातातला पेन थांबला,
'काका धीर धरा...'

"धीर हाय म्हणूनच इथवर आलोय,
वावराची आण दिल्या आजानं
शेती करायचीच आसल,
तर मुंडकं रश्शीच्या पिळाला न्हाई,
नियतीच्या बैलगडीला जुपायची शिकवण हाय त्याची!"
त्यांनी गहिवरून फॉर्मवर सही दिली...

काकांच्या डोळ्यांतून 
आज मी आशावाद ओघळताना पाहिला! #Floods
काका तुमचं किती नुकसान झालं?

विचारलं, इतरांना विचारावं तसच...
तसं इतरांपेक्षा काही वेगळा भाव नव्हताच... 
त्यांनी सांगितलं,
त्यांनीं सांगितल
नेल बाबा माझ सारं उभं पीक वाहून
मालकिनीचा सणांचा हुरूपच गेला हे सगळं पाहून
 पोरांच्या अभ्यासासाठी माराय लागणारा बॅलन्स...
 गुराढोरांचा चारा...
 म्हातारीचं मोतीबिंदू आप्रेशन...
गेलं समदच पुन्हा राहून.!

हातातला पेन थांबला,
'काका धीर धरा...'

"धीर हाय म्हणूनच इथवर आलोय,
वावराची आण दिल्या आजानं
शेती करायचीच आसल,
तर मुंडकं रश्शीच्या पिळाला न्हाई,
नियतीच्या बैलगडीला जुपायची शिकवण हाय त्याची!"
त्यांनी गहिवरून फॉर्मवर सही दिली...

काकांच्या डोळ्यांतून 
आज मी आशावाद ओघळताना पाहिला! #Floods
rohinikadam9296

Rohini kadam

New Creator