Nojoto: Largest Storytelling Platform

आज मी चंद्रमा..!! जाग प्रिये आज ,बघ जरा नभात, प्र

आज मी चंद्रमा..!!

जाग प्रिये आज ,बघ जरा नभात,
प्रियकर तुझा जळतो आहे कोषात!

नभाएवढे भासे मज विरहाची कहाणी,
चंद्रमा आज ढाळतो डोळ्यातून पाणी!
घे प्रतिबिंब माझे टिपूनी आज आरशात
जाग प्रिये आज बघ जरा नभात..

ये उंबरठ्यावरी हाक वाऱ्याची ऐक जरा,
घेऊनि मिठीत तयास क्षणभर तू उभी रहा!
मजलाही येऊनि बिलगेल वारा क्षणभरात!
जाग प्रिये आज,बघ जरा नभात.....

नसणार मी आता इथे होईल जेव्हा सकाळ,
मजला दूर  क्षितिजापलिकडे नेईल काळ!
दिसणार नाही तुजला मी ,मृत्यूच्या ग्रहणात
जाग प्रिये आज,बघ जरा नभात... #चंद्रमा
आज मी चंद्रमा..!!

जाग प्रिये आज ,बघ जरा नभात,
प्रियकर तुझा जळतो आहे कोषात!

नभाएवढे भासे मज विरहाची कहाणी,
चंद्रमा आज ढाळतो डोळ्यातून पाणी!
घे प्रतिबिंब माझे टिपूनी आज आरशात
जाग प्रिये आज बघ जरा नभात..

ये उंबरठ्यावरी हाक वाऱ्याची ऐक जरा,
घेऊनि मिठीत तयास क्षणभर तू उभी रहा!
मजलाही येऊनि बिलगेल वारा क्षणभरात!
जाग प्रिये आज,बघ जरा नभात.....

नसणार मी आता इथे होईल जेव्हा सकाळ,
मजला दूर  क्षितिजापलिकडे नेईल काळ!
दिसणार नाही तुजला मी ,मृत्यूच्या ग्रहणात
जाग प्रिये आज,बघ जरा नभात... #चंद्रमा