Nojoto: Largest Storytelling Platform

चार दिसाची पाहुनी म्हनून आलीस माझ्या घरी बघता तुज

चार दिसाची पाहुनी म्हनून आलीस माझ्या घरी 
बघता तुजला डोळा टचकन पाणी माझ्या भरी
 तूच का ती दिसली नाही तर जीव कासावीस होई
 रूप तुझे आठवते अजूनही ही का नाही मनात आनंदले तुला पाहून 
दुःख वाटे तुझा चेहरा मी पाहते मनात माझ्या कालवाकालव होते तू कुठे गेलीस की वाट तुझी मी पाहात होते
 तुझ्याशिवाय कुठेच मी कधीच राहात नव्हते 
पण एक दिवस असा आला तुला सोडून जावे लागले 
तुझ्या डोळ्यातील काळजी आणि अश्रू मी पाहिले 
आज जेव्हा तू घरी माझ्या आलीस
 कीती दमलीस अन् किती थकलीस
 तेज तुझ्या चेहऱ्यावरचे उडून गेले कुठे 
शोधत होते तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव जुने
 शाळेतून मी येत होते जेव्हा
 तू समोर दिसलीस की मनात आनंद वाटे तेव्हा 
तुझ्या ताटातला घास ठेवीत होतीस तू 
आठवते मजला आज हि असे कुणीच करत  नाही आता
 पण तू इतकी थकालीस पाहून मन माझे आतून रडते 
 वाटते मजला जुने ते दिवस परत यावे 
तुला बिलगुनी सारे सुख घ्यावे
एक दिवस तू म्हणालीस तुझ्या घरी कधी आलो तर पोह्याचा घास तरी करशील का 
तुझे बोलणे माझे हसणे यावे परत दिवस ते 
काय दिसत होतीस टवटवीत अन् गोजिरवाणी 
आज मग तू अशी का आजारी तीच तू ग सुंदर अन् माझी खरी तुझे भाव मजला सारे कळत होते तुझ्या चेहऱ्यावरचे सारे हसू खोटे चार दिवस आलीस तू माझ्या घरी पाहूनी  
गेलीस माझ्या मनी चुटका देऊनी
पण जन्मोजन्मी तूच मिळावी तुझ्याच उदरी मी जन्म घ्यावा
अन् तू सदैव अशीच राहावी माझ्यासाठी माझी आई...........
(कवीयत्री : स्वाती महेंद्र जाधव)
          🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल