Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ ....! आयुष्यात अशी कठोर - कठीण वेळ येते... आपल

वेळ ....!
आयुष्यात अशी कठोर - कठीण वेळ येते...
आपले कोण आपल्याला कळू लागतात..!
आपण ज्या वाटेवर मोठ्या आशेने चालतो...
त्यावरून आपलेच आपल्यापासून दूर पळू लागतात...!
तुमच्या आधाराने ज्यांनी केला प्रवास सुरू..
तेच अर्धवट साथ सोडून मागे वळू लागतात...!
तुम्ही ज्यांच्याशी जिव्हाळ्याने वागलेले असता..
तेच तुमच्याशी जिव्हारी लागेल असे वागतात...!
ज्यांना तुम्ही आकड्यांची ओळख करून दिलेली असते..
तेच तुम्हाला न चुकता  हिशोब मागतात...!
ज्यांना तुम्ही मदत करून अडचणीतून सावरलेले असते...
तेच तुम्हाला मदत करायची सोडून फुकटचा सल्ला देऊ लागतात..!
पण एक दिवस वेळ नक्की बदलते हे ज्याला ठाऊक असते...
त्याचं आयुष्य हे प्रसंग त्याचे अनुभव समृद्ध करून जातात...!
- संतोष जाधव.(SJ)

©Santosh Jadhav #वेळ 

#Joker