Unsplash एक अशी गोष्ट जी कधी व्यक्त नाही झाली, मनातल्या मनात फक्त वाढत मात्र गेली.... कधी कधी तुझ्यापेक्षा तीच जास्त गोड वाटते, तू नसलास जरी सोबत ती सावलीसारखी सोबत असते..... गर्दीत असो वा एकांतात साथ कधीच सोडत नाही, जिव्हाळ्याचे नाते तिचे नी माझे ती कधीच तोडत नाही.... तुझ्यापेक्षा जास्त मी तिच्यामध्ये रमते, गालावरती हसू आणणे तिलाही अचूक जमते.... नको समजू दुसरं काही तीच आहे माझ्या जीवनाची साठवण, या जगण्यातल गुपित माझ ती तुझी आठवण....तुझी आठवण.. ©Anisha Kiratkarve #lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता