आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने माझी एक छोटीशी कथा पोस्ट करते आहे... Read in caption 👇 एक कथा... त्याच्या जीवनात आता काही उरले नव्हते. त्याने खाली पाहिले अणि टेरेस च्या कठड्यावर अर्धा खाली वाकला, स्वतःला झोकून देण्यासाठी. पाठीमागून एक थंडगार स्पर्श खांद्यावर जाणवला. आवाज कानावर आला "काय करतो आहेस हे?" नीरज चमकला, वळुन पाहीले "कोण आहे, समोर ये" म्हणाला. एक आकृती काळी.. "सोड मला ईतक शिकुन एक नोकरी नाही मिळत चांगली,अणि जिच्यावर जिवापाड प्रेम केलं ती पण उद्या दुसर्याची होणार लग्न आहे तिचे" नीरज बोलतच होता... "हेच चुकत आपल, एक अपयश अणि संपवतो आपल आयुष्य. माझं नाव प्रताप आवडीने ठेवलेलं. बोर्डात नापास काय झालो, लाज वाटली स्वताची. सगळे पास होऊन पुढे गेलेले. संपवलं स्वतःला. आई बाबांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांच्या आशा, प्रेम, मित्रांचे प्रेम, याचे गाठोडे बांधुन त्यांना पण माझ्याबरोबर संपवतो आहे हे कळलेच नाही मला तेव्हा. अणि आता हा नावाचा प्रताप... पश्चाताप होऊन फिरतोय. दुःख दिसते त्यांचे,पण काही करु शकत नाही. संधी मलाही मिळाली असती दुसरी, अणि तुलाही मिळणारच आहे नीरज, मागे फिर.. गमावलेले पाहण्यापेक्षा, जे कमऊ शकतोस ते पहा. नीरज सुन्न झालेला...