समाज जगू देत नाही जबाबदारी मरू देत नाही परिस्थिती काही करू देत नाही मन हवं तसं वागू देत नाही... आयुष्याचं काही कळत नाही हे मन मात्र वळत नाही रचलेलं सरण जळत नाही जाळलेलं देह वाळत नाही... मला जात पात पटत नाही कुणी जातीशिवाय खेटत नाही ह्या विचारांचे निखारे विझत नाही तरी कुणी माणूस म्हणून पेटत नाही... माणुसकीत कुणी भिजत नाही एकाच छतात निजत नाही ह्या मातीत कुणी मिसळत नाही आणि रक्त कोणाचे उसळत नाही... ही जातीची दरी कुणी मिटवत नाही दुसऱ्या जातीला कुणी शिवत नाही रक्ताचं महत्व तरी तेवत नाही माणूस मेला तरी हे शिकत नाही... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) motivation shayari