Nojoto: Largest Storytelling Platform

दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ शाप एकलेपणाचा भोगी

दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ
शाप एकलेपणाचा भोगी काटेरी बाभळं

ताप जाळतो विखारी होरपळ सोसवेना
मंद उसासे सोबती धग कोणां जाणवेना

घेतं कानोसा सावल्या आडोशाला पहुडल्या
काटे बोचता एकाकी सख्या त्याही पांगियेल्या

टच्च दाटलं डोळ्यांत उगां हिरवं सपानं
घाली रिंगण भोवती ठेच लागलं दमानं

काळ ढळतो, पळतो पायी बांधून भोवरा 
दिसं–मासं उलटले जीव व्याकूळ बावरा 

भरभरणारा वारा देई सांगावा कसला?
कुजबूज पानोपानी रानी वळीव हसला

©Shankar Kamble #parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत
दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ
शाप एकलेपणाचा भोगी काटेरी बाभळं

ताप जाळतो विखारी होरपळ सोसवेना
मंद उसासे सोबती धग कोणां जाणवेना

घेतं कानोसा सावल्या आडोशाला पहुडल्या
काटे बोचता एकाकी सख्या त्याही पांगियेल्या

टच्च दाटलं डोळ्यांत उगां हिरवं सपानं
घाली रिंगण भोवती ठेच लागलं दमानं

काळ ढळतो, पळतो पायी बांधून भोवरा 
दिसं–मासं उलटले जीव व्याकूळ बावरा 

भरभरणारा वारा देई सांगावा कसला?
कुजबूज पानोपानी रानी वळीव हसला

©Shankar Kamble #parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत