अमूल्य जीवनावर तुझाच हक्क ग! आई तु माझी....तुच माझी प्रित ग! आत्मविश्वासाची चाबी...तुच आधार ग! श्वास माझा तु...तुच माझा विश्वास ग!.।।1।। कोमल हे मन....तुझीच देन ग! सांभाळून नाती सारी...लावीन प्रेमाची ज्योत ग! गुरू तु माझी....तुच मार्गदर्शक ग! सत्याचा वाटेवर सैदव... राहतील हे पावले ग!।।2।। नाही पाहुणी...मी तर तुझी सावली ग! श्वासाचा वेलीवर....तुझेच नाव ग! सुंदर विचार...तुझेच उपहार ग! अहिंसा,सहनशक्ती ची तु मुर्ती ग!।।3।। एकात्मता,समतेचा तुझा तो पाठ ग! देई जीवनाला सुखाचे क्षण ग! आई तु माझी...तुच माझी प्रित ग! अमूल्य जीवनावर तुझाच हक्क ग! ।।4।। ©Asha...#anu #नोजोटोराइटर्स #नोजोटोमराठी #आई #अनु #MothersDay2021