Nojoto: Largest Storytelling Platform

"माणूस आणि झाड" माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं एक

"माणूस आणि झाड"

माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं
एक नैसर्गिक नातं आहे..
रहायचं, खायचं अन् जगायचं,
जणू मातीवर गवताचं पातं आहे..

झाडाच्या फांद्याही नात्या गोत्यासारख्याच
स्वार्थापाई चिकटून राहतात..
खोडाकडून काहीच मिळाले नाही तर
निर्दयी साथ सोडून देतात..

पाना फुलांचा बहर आल्यावर
सगळे भोवताली रेंगाळतात..
अन् उन्हाळ्यात झड लागल्यावर
सगे सोयरेही दूर पळतात..

झाडं झाडांचा धर्म पाळतात
ऊन डोक्यावर घेऊन सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात..

पण एक दिवस माणूसही
झाडासारखा वयोवृद्ध होईल..
अन् आयुष्यभराचा मोठेपणा
पानासारखा गळून जाईल..!
                       Copyright @kganesh
                        9028110509 माणूस आणि झाड
"माणूस आणि झाड"

माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं
एक नैसर्गिक नातं आहे..
रहायचं, खायचं अन् जगायचं,
जणू मातीवर गवताचं पातं आहे..

झाडाच्या फांद्याही नात्या गोत्यासारख्याच
स्वार्थापाई चिकटून राहतात..
खोडाकडून काहीच मिळाले नाही तर
निर्दयी साथ सोडून देतात..

पाना फुलांचा बहर आल्यावर
सगळे भोवताली रेंगाळतात..
अन् उन्हाळ्यात झड लागल्यावर
सगे सोयरेही दूर पळतात..

झाडं झाडांचा धर्म पाळतात
ऊन डोक्यावर घेऊन सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात..

पण एक दिवस माणूसही
झाडासारखा वयोवृद्ध होईल..
अन् आयुष्यभराचा मोठेपणा
पानासारखा गळून जाईल..!
                       Copyright @kganesh
                        9028110509 माणूस आणि झाड

माणूस आणि झाड