मुळात आपण सगळे असतोच लहान मुलांसारखे लहान होऊन वागावंसं ही वाटतं खट्याळ व्हावंसं वाटतं पण मोठे झालो, जबाबदारी वाढली आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..? परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं थोडं स्वतःला वेळ देऊन लहान मुलांसारखं पोरकट वागावं रडणं तर नेहमीचंच असतं ना थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं.. वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं? मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं.... Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life