Nojoto: Largest Storytelling Platform

लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं क

 लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय?

लग्न म्हणजे नेमकं काय?
दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग्न म्हणजे माझे हसवणे,तुझे हसणे.. तू रुसने मी मनवने.. मी स्वप्नी बघणे,तू सत्यात उतरवणे...मी पाहणे आणि तू दिसणे...

लग्न म्हणजे, मी रोज नवनवीन पदार्थ बनवणे आणि तुझ मन भरून खाणे,कौतुक करणे पण मी आजारी असली की मात्र तू बनवलेल्या अळणी खिचडीतही मला पंचपक्वानाचा आस्वाद मिळणे! लग्न म्हणजे दोन जणांनी एकत्र येऊन चार भिंतींना घर बनवणे, जरी चुकला एक तर दुसऱ्याने त्या चुकांवर पांघरूण घालणे!

लग्न म्हणजे , 'मी आहे म्हणून टिकले, दुसरी असती तर कधीच सोडून गेली असती😉' पासून तर 'तू आहेस म्हणून मी आहे☺' असे म्हणणे! लग्न म्हणजे सुसाट सुटलेल्या तुझ्या बाईकच्या बॅक सीट वरून एक हाथ तुझ्या खांद्यावर येणे आणि अचानक तू बाईक चा स्पीड कमी करणे!

sandyjournalist7382

sandy

New Creator