सप्तरंगाची करण्या उधळण आला आला हा होळीचा सण गोड गोड पुरणपोळीचा नैवैद्य करू निराशा ,निद्रा आळस, दुःख यांचे दहन करू नवीन रंगाने सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरू हा होळीचा सण आपण सारे एकजुटीने साजरा करू नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #collab #yqtaai चला तर मग लिहूया. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. #YourQuoteAndMine