Nojoto: Largest Storytelling Platform

शिक्षक भेट (लेख👇) साधारणपणे लांबून येणारा माणूस द

शिक्षक भेट (लेख👇) साधारणपणे लांबून येणारा माणूस दिसला की माणसं एकतर रस्ता बदलतात , किंवा स्वतः पुढे जाऊन त्या व्यक्तीशी संवाद साधतात किंवा थांबून राहतात ती व्यक्ती येईपर्यंत. त्यातून तुम्हाला तुमचे शिक्षक जेव्हा दिसतात तेव्हा तुम्ही जाऊन त्यांच्या पाया पडता आणि नंतर संवाद साधता.आज असंच झालं, मी स्वतः शिक्षक.माझं शिकवून मी पुन्हा माझ्या जागेवर जात असताना मला माझे सर दिसले ज्यांनी मला शिकवलं, घडवलं. मी अगदी माझ्या धुंदीत, लॅपटॉपची जड बॅग , डोक्यात विचारांचं काहुर या अवस्थेत विद्यार्थ्यांच्या गराड्यातुन माझा रस्ता शोधत शोधत जात होते.मी लांबून सरांना पाहिलचं नव्हतं.त्यांनी मला पाहिलं होतं.ते मला बघून तसेच थांबले होते.मी दहा पावलांवर आल्यावर मी जेव्हा मान वरती केली तेव्हा पाहिलं सरांना. जेव्हा पाहिलं तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला होता.माझ्या चेहऱ्यावर वाजलेले बारा बहुतेक सरांनी जाणलं असावं.सरांना पाहून क्षणभर मी सगळं विसरले , सरांना म्हटलं , "सर तुम्ही माझ्यासाठी थांबलात ?" सर म्हणाले, " मग समोरून डॉक्टर येत असताना मी थांबू नको का?"
मी हसले आणि सरांना म्हटलं , "काय सर फिरकी घेत आहात का ? तुम्हाला माहिती आहे मी पीएचडी नाही करणार " , मग काय पुढे  तासभर उभ्या उभ्याने खूप खूप गप्पा झाल्या. खांद्यावर बॅगेचं ओझं होतंच परंतु डोक्यावरच असंख्य विचारांचं ओझं सरांनी संवादाने चुटकीसरशी दूर केलं.
त्याचबरोबर मला पुढे काय शिकायचं हे सरांना मी सांगितले.सर प्रचंड खूश झाले ऐकून.ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात कारण त्यांना मी मेहनती आणि हुशार विद्यार्थिनी वाटते. त्यांची इच्छा असते की पोस्ट ग्रॅज्युएशनपुढे शिकावं.सरांनी लगेच मला जे शिकायचं आहे त्याला लगेच एक दुसरा पर्यायी मार्ग सांगितला जेणेकरून मला जे शिकायचं आहे ते सोपं होऊन जाईल. एकदा तुझं काम झालं की नक्की सांग आणि तुझं काम नाही झालं तरीही सांग, मी आहे काळजी करु नको असंही म्हणाले.
खरंच ! शिक्षक कुठेही भेटु दे , ते तुमचा वर्ग , तुमचा तास घेतातच.तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात , जगण्याचा मार्ग सुकर करतात.जगण्यासाठी एक ध्येय देतात.
--प्रेरणा