Nojoto: Largest Storytelling Platform

एकदा माझ्याही मनातून विचार करून बघ ना तुला माझ्या

एकदा माझ्याही मनातून विचार करून बघ ना 
तुला माझ्या मनातलं सगळं गुपित कळणार 
सहजपणे बोलायला तुला काहीच जरी वाटत नसलं 
तरी एकदा बघ माझ्या मनातली वेदना नक्की कळणार...

तुला वाटत असेल वेगळे झालो की सगळे प्रश्न सुटतील
पण तेव्हा तर अजून वेदना मिळणार 
झालोच जर एकमेकांपासून वेगळे कायमचं 
तेव्हा मात्र प्रत्येक क्षणी मृत्यू ची अनुभूती मिळणार...

मला नाही माहिती तुझ्या मनात नेमकं काय?
कदाचित दूर झाल्यानंतर च तुला माझं प्रेम कळणार 
असेल तेव्हा तुझ्याकडे सगळं काही सोयीचं 
पण तेव्हा मात्र मीच तुझ्याजवळ नसणार...

आहोत तोपर्यंत सोबत राहू बोलल्याने नाही होत 
दूर गेल्याशिवाय विरहाच्या वेदना कशा कळणार 
विरहाच्या भयापेक्षा नकळत आलेली मृत्यू बरी 
हे फक्त अडकलेलं जीव सोडून गेल्यानंतरच कळणार...

मला नाही माहिती तुझ्या आयुष्यात प्रेमाची परिभाषा काय 
मला तर कायमचे एकत्र आल्याशिवाय मोक्ष नाही मिळणार 
तुला नसेल कदाचित भय लग्नानंतरचं 
मला तर क्षणोक्षणी फक्त यातनाच मिळणार...

लग्नाशिवाय प्रेमाला अर्थ आणि शेवट नाही 
हे केल्याशिवाय तुलाही कसं कळणार?
तू जरी धीर देत जाशील दूर मला सोडून 
मला नाही माहिती त्यानंतर माझ्या आयुष्यात काय उरणार???

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #confused  मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी कविता मराठी प्रेम