Nojoto: Largest Storytelling Platform

#कोण उरे शेवटाला.... कोण उरे शेवटाला विचारला मीच म

#कोण उरे शेवटाला....
कोण उरे शेवटाला
विचारला मीच माझ्या मना हा प्रश्न
घेतला मग असाच अंदाच सार्‍यांचा पण जो तो इथं स्वतःमध्येच असे मग्न........
मायबाप कर्तव्याला देई संस्कार शिक्षण आयुष्याच्या संध्याकाळी काठी तयांची आपण
भाऊ बहिणीचे नाते लग्नापूर्वी वाटे छान
हिस्से वाटणीकरता वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र तेही देती पैशाला हो मान
थोडे पाहिले शेजारी असे जे अडचणी वेळी घेती धाव
नाहीतर म्हणतात बरेचदा तु फक्त आम्हाला उसनवारीलाच वेळेवर पाव........
गेलो जेव्हा मी मित्रांच्या मेळ्यात पैसेवाला असे तिथेही भारी
बोले हातचे राखून वागती कट्ट्यावरही मित्र सारी........
नाही कुणीही कुणाचे तरी असे किती हा मोठा गोतावळा
कितीही खडू शुभ्र वापरला तरीही सदा दिसे फक्त काळा फळा........
कर्म करता चांगले फळ मिळे तसेच चांगले मग आपोआप 
लौकिकाच्या आशिषाने शिगोशिग भरे माप....
माझे माझे द्या सोडून सांगू नका आता दावा
वटवृक्ष होण्याआधी सत्कर्माचे रोप लावा.........
खेळवते सर्वांना ही नियती मांडुनी तिचा औट घटकेचा डाव
पण असं दिव्यत्वाचं जगणं जगेन मी की मृत्यूनंतरही कोरलं जाईल
चंद्र सुर्य अन् या धरेवर माझं नाव
@शब्दवेडा किशोर

@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #काळाच्याओघात