Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या वेणीतले फुल गळलेत सारे सडा पडला सकाळचा.. ह

 तुझ्या वेणीतले फुल गळलेत सारे सडा पडला सकाळचा..
हळुवार सुगंधाने मालवला आनंदाचा सुमुख स्वच्छंदी मळा
स्पर्शुनी हळवा सकाळच्या प्रकाशात हरवला सारा..
शांत रूपात तुझ्या मनाचा गुप्तहेर उमल्या..
कळ्या तुझ्या की गंधाचा अंधक चक्षु मुखवटा ..
 मोती सांडलेत जसे उतु गेलेले शुभ्र मायेचे जाळे ते..
टोपलीत वेचावे कीती माझ्या उचंबळले ध्यानी सारे..
रांगोळी अंथरली जशी आखुनी आकृती शुभ्र फुल लटकलेला रंगीत गोंडा..
पाकळ्यांची नक्षी उमटली जशी हरवलेला शुभ्र हिरा..
पानांत लपलेला कधी तुटुनी जरी पडलेला अंथरूण भुईवरी सप्तरंगात निजलेला..
शांत तु अलगद हलका फुल निवडुन पडतो खाली..
लटकलेला आधारा तुझ्या दवबिंदवाचा टिपका..
उमलेला तु पारिजातका गंधात तुझ्या अनोख्या रूपांत आळवलेला..
शिंपले सांडले जसे समुद्राच्या किनारी नटवलेली नक्षी कोरलेली..
परीक्रमा तुझी जशी एक दिवसाचा पाहुना तु फुल की कळी..
गुंतलेला कधी फांद्यांच्या आडवश्याला लाजरे मुख करूनी शांततेत मालवलेला..
पाऊसाच्या थेंबानी स्वप्नांत डिवचलेला..
किती अलगद आळंगलेला तु त्या झाडाच्या कुशीतला..
सकाळचा फिरस्ता तु वाटेकरी सुगंधाचा..
बघुनी तुला लाजले मन जरासे सोबती पुष्प टोपलीतला..
मनावर ओढलेला शांततेचा तु सुगंधीत पडदा..
     #फुले   #पारिजात 

#मराठीकविता  #मराठीलेखणी 

#yqquotes  

#yqmarathi  #yqfamily

writert7346

gaurav

New Creator