आज सकाळी नवल झाले थंडीत या गोड झोप लागली वाऱ्याला रहावले नाही, कानाशी येऊन गुनगुनत राहीला माझी झोप मोडू पाहु लागला माझी ती साखर झोप गोड होती सहजा सहजी मोडणार कशी बसला थकून, बाजूला होऊन बोलावले त्याने नवं किरणांना किरण ते घुटमळत राहिले केसांना गुंतंत गेले केसांना भुरळ पडली किरणांना काही वेळ अंथरूणात पाय पसरू लागले विसरले सारे , उठवणे, अंथरुणावर पडून राहिले विसर पडला किरणांना उठवणे सोडून,आराम करू लागले वाऱ्याने आवाज केला , खिडकी बंद करून किरणांना सोबत घेऊन गेला. कवडसातुन डोकावून हसत होते उठली की नाही पाहत होते आवाजाने माझी साखर झोप गोड झाली आज सकाळी, वाऱ्या किरणांची खेळी पाहुन माझी सकाळ गोड झाली.....