जोजविले मी तळहातावर फुंकर घाली मीच मला मनांस हळव्या कुरवाळीता गूज कळले काय तुला? भारी सांगड मनां - क्षणाची हात गुंफुनी सरी माळीती गंधित सुमने सुखदुःखाची कुपीत इवल्या भरुनी वाहती आषाढाचे मेघ झरावे आभाळाशी नाळ तूटती भेगाळूनी मग ओढ कुणाची अधांतरी का पाझर सुटती? थरथरणाऱ्या धरणीलाही भूल पडावी सांज धूळीची शुभ्र चांदणे माखून यावी मंद पाऊले रात्र कळीची विसावण्या पानांवर जेंव्हा दवबिंदूंचा अबोल ठेवा धवल धुक्याची दाट दूलई डोंगरमाथी विरळ हेवा क्षणां - क्षणांला रूप पालटे कृष्ण- धवल ते इंद्रधनुचे किमयागार तो खराच निर्मिक निर्मिले त्याने रंग मनाचे ©Shankar Kamble #मन #भाव #भावना #प्रेम #प्रीत #भावुक #प्रेमकवि #Time