हे लंबोदर वरदविनायक सकलांचा तू तारणहारक || सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सिद्धिविनायक तू मोरेश्वर सकलकलांचा तू महासागर विघ्न विनाशक तू करुणाकर || पुण्यभूमीचा तू सुखदाता रिद्धी सिद्धीचा भाग्यविधाता गिरीशिखरांचा तू परमात्मा आद्यपुजक अन् युगनिर्माता || ...... आकांक्षा ©Akanksha Kelkar Ganpati Bappa Morya