Nojoto: Largest Storytelling Platform

White दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती... मिठीत ये

White दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती...
मिठीत येवून मोहरणारा, एक गुलाबी श्वास ती...
मरुस्थलातील वाटाड्या मी ,मृगजळाचा भास ती...
दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती...

लाजताना लाजरीला पाहिले ना मी जरी..
गाज तिच्या स्पंदनांची,रुळते या ह्रिदयावरी...
पहाटेचे स्वप्न ती,आभासी भास ती...
दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती ...

गंधासाठी शोधतो,लाजरा मोगरा तिला ...
चंद्र थोडा थांबतो,पाहण्या तिच्या कला ...
सागराची लाट ती,या मनाची वाट ती ...
दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती....

मिठीत येवून मोहरणारा 
एक गुलाबी श्वास ती ..... ती...

©Pranil Pawar #Lake दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती

pranilpawar3022

Pranil Pawar

New Creator