Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण... तुझ्यासाठी जागल्या कित्तेक रात्री रात्री,

आठवण...

तुझ्यासाठी जागल्या कित्तेक रात्री रात्री,
तुला कशी ग वेळ मिळत नाही,
वाट बघून बघून थकलो,
तुला कसं ग कळत नाही....


तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी एकही क्षण,
तुझ्यासाठी अर्पिले मी आपुले जीवन,
तुला आजकाल कसा ग मी आठवत नाही,
वाट बघून बघून थकलो,
तुला कसं ग कळत नाही....

तुझ्यावाचून माझ्या जीवनाला नाही अर्थ,
तुझ्याशिवाय माझा जीवन झाला व्यर्थ,
तूच आज माझ्याशी का ग बोलत नाही,
वाट बघून बघून थकलो,
तुला कसं ग कळत नाही....

तुझ्या आठवणीने माझ्या नयनी येतात अश्रू,
तूच सांगना मी तुला कसा ग विसरू,
तुझ्या आठवणी माझ्या मनातून जातच नाही,
वाट बघून बघून थकलो,
तुला कसं ग कळत नाही....

©spandan lonare #marathi #MarathiKavita 
#directions
आठवण...

तुझ्यासाठी जागल्या कित्तेक रात्री रात्री,
तुला कशी ग वेळ मिळत नाही,
वाट बघून बघून थकलो,
तुला कसं ग कळत नाही....


तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी एकही क्षण,
तुझ्यासाठी अर्पिले मी आपुले जीवन,
तुला आजकाल कसा ग मी आठवत नाही,
वाट बघून बघून थकलो,
तुला कसं ग कळत नाही....

तुझ्यावाचून माझ्या जीवनाला नाही अर्थ,
तुझ्याशिवाय माझा जीवन झाला व्यर्थ,
तूच आज माझ्याशी का ग बोलत नाही,
वाट बघून बघून थकलो,
तुला कसं ग कळत नाही....

तुझ्या आठवणीने माझ्या नयनी येतात अश्रू,
तूच सांगना मी तुला कसा ग विसरू,
तुझ्या आठवणी माझ्या मनातून जातच नाही,
वाट बघून बघून थकलो,
तुला कसं ग कळत नाही....

©spandan lonare #marathi #MarathiKavita 
#directions