Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry कधी -कधी मनात असलेलं पण बोलायचं राहून

#OpenPoetry कधी -कधी मनात असलेलं पण बोलायचं राहून गेलेलं, सगळं बोलून टाकावं
  आणि मनातलं ओझं हलकं करून घ्यावं. 
कुणाशी लपवून किंवा मनातल्या मनात ठेवून काय होणार? 
वेळ निघून गेली की, आपल्या भावनांना आज जिथे जागा मिळू शकते 
कदाचित उद्या तिथे जागा मिळणार की नाही हे कोण सांगू शकतो. 
वेळ बदलते, त्याबरोबर माणसे बदलतात आणि मग त्रास आपल्याला होतो. 
प्रत्येक व्यक्ती डोळे वाचू शकत नाही, चेहरा बघून भावना समजू शकत नाही. 
म्हणून अशावेळी आपलं व्यक्त होणं गरजेचं असतं. 
आपल्या भावना ज्याला सांगायचे आहे किमान त्याला तरी ते सांगून टाकावं.
 आणि मोकळं होऊन जावं, कारण, आयुष्यभर ते ओझं मिरवण खूप कठीण असतं. 
वेळ निघून गेल्यावर खूप पच्छाताप होतो. 
नंतर असं वाटते की, तेव्हा सांगितलं असतं तर बरं झालं असतं.. 
(प्रीत )