Nojoto: Largest Storytelling Platform

ह्या जगात तुम्हाला लाख चेहरे दिसतील पण त्या एका चे

ह्या जगात तुम्हाला लाख चेहरे दिसतील
पण त्या एका चेहऱ्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही
जे तुमच्या मनात बसलेलं असतं...

कितीही सुंदर चेहरा तुमच्या समोर येउद्या
पण त्या चेहऱ्याइतकं सुंदर तुम्हाला वाटणारच नाही
जे  तुमच्या नजरेत बसलेलं असतं...

कसं असतं चेहरे लाखो मिळतील पण मनासारखे नाही
आणि मनात असतं त्यासारखं कुणी नाही
कारण आवड आणि प्रेम यात फरक असतं...

आकर्षण,आवड चेहऱ्यापुरते चेहरा बघून प्रेम होत नसतं
आणि खऱ्या प्रेमात कसलीच अट नसते
कारण, प्रेम हे नकळत कधीही आणि कुणावरही होत असतं...

चेहरे हजारो मिळतील म्हणून मिळालेलं खरं प्रेम जपा
चेहऱ्यावर तर आज ना उद्या सुरकुत्या पडतीलच 
परंतु, मन हे मरेपर्यंत जसं च्या तसं असतं...

हल्ली बदललं आहे ह्या जगातलं प्रेम आणि करण्याची पद्धत
पण ते आकर्षण असणारं प्रेम क्षणिक असतं
आणि खरं प्रेम हे मृत्यू नंतर सुद्धा जिवंत असतं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #bajiraomastani #Real_Love