Nojoto: Largest Storytelling Platform

पंढरीच्या वाटे!भार वैष्णवांचा! सोहळा सुखाचा! अनुप

पंढरीच्या वाटे!भार वैष्णवांचा!
 सोहळा सुखाचा! अनुपम!* 

 माया मोह बंध! उतरले पार!* 
 तरला सागर !जड जीवा!* 

 देहाची ना शुद्ध! चित्त गुंतलेले!* 
 नामात दंगले !रामकृष्ण!* 

 *मुखी घेता नाम !शीण हा सरला!
 भरून उरला! देहांघटी!* 

 सवे चालवितो !भार तो वाहतो!* 
 नेत्रां दाववितो! पाप पुण्य!* 

 ओढ अंतरीची !अंतराला ठावी!* 
 गळाभेट व्हावी !मनीं आस!* 

 *पायी लोटांगण !आसवे प्रक्षाळी!
 चरणे सावळी !विठुराया!* 

 कंठ सद्गगदित !भाव ही खुंटले!* 
 विकार लोपले! दर्शनाते!*

©Shankar Kamble #वारी #विठ्ठल_रखुमाई #विठ्ठल_विठ्ठल #वारी #वारी_आयुष्याची #दिंडी #पंढरपूर #विठ्ठल
पंढरीच्या वाटे!भार वैष्णवांचा!
 सोहळा सुखाचा! अनुपम!* 

 माया मोह बंध! उतरले पार!* 
 तरला सागर !जड जीवा!* 

 देहाची ना शुद्ध! चित्त गुंतलेले!* 
 नामात दंगले !रामकृष्ण!* 

 *मुखी घेता नाम !शीण हा सरला!
 भरून उरला! देहांघटी!* 

 सवे चालवितो !भार तो वाहतो!* 
 नेत्रां दाववितो! पाप पुण्य!* 

 ओढ अंतरीची !अंतराला ठावी!* 
 गळाभेट व्हावी !मनीं आस!* 

 *पायी लोटांगण !आसवे प्रक्षाळी!
 चरणे सावळी !विठुराया!* 

 कंठ सद्गगदित !भाव ही खुंटले!* 
 विकार लोपले! दर्शनाते!*

©Shankar Kamble #वारी #विठ्ठल_रखुमाई #विठ्ठल_विठ्ठल #वारी #वारी_आयुष्याची #दिंडी #पंढरपूर #विठ्ठल