Nojoto: Largest Storytelling Platform

#पावसाचे थेंब.... ओल्या पावसाचे थेंब आले कोरडे धाव

#पावसाचे थेंब....
ओल्या पावसाचे थेंब आले कोरडे धावून
उभा भेगाळला जीव झाला मऊ मातीहून
तरी फुटता फुटेना कसा नशीबाचा दाणा
मातीतून उगवेना पुणवेची चंद्रकळा
थंड वाऱ्याच्याही कशा उरी लागतीया झळा
सोसवेना सावलीला जीव गेलाया रापून
कशी सांगावी उन्हाला आभाळाची दुःखविणा
गेली कलंडून रात पळ हा संपता संपेना
काहिलीची उलाढाल कशी सूर्याला कळेना 
धरेची या स्वप्नमाला आठवणी मागे ठेवून
तिला सोडुनिया मागे कशी चालली अस्ताला
मागे उजेड हा नव्या पहाटेचा सोडून 
ओल्या पावसाचे थेंब आले कोरडे धावून
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पावसाची_सर
#पावसाचे थेंब....
ओल्या पावसाचे थेंब आले कोरडे धावून
उभा भेगाळला जीव झाला मऊ मातीहून
तरी फुटता फुटेना कसा नशीबाचा दाणा
मातीतून उगवेना पुणवेची चंद्रकळा
थंड वाऱ्याच्याही कशा उरी लागतीया झळा
सोसवेना सावलीला जीव गेलाया रापून
कशी सांगावी उन्हाला आभाळाची दुःखविणा
गेली कलंडून रात पळ हा संपता संपेना
काहिलीची उलाढाल कशी सूर्याला कळेना 
धरेची या स्वप्नमाला आठवणी मागे ठेवून
तिला सोडुनिया मागे कशी चालली अस्ताला
मागे उजेड हा नव्या पहाटेचा सोडून 
ओल्या पावसाचे थेंब आले कोरडे धावून
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पावसाची_सर