Nojoto: Largest Storytelling Platform

गृहिणी... ------------------ हळव्या मनातून आपलेपण

गृहिणी...

------------------
हळव्या मनातून
आपलेपणा देते,
सुखदुःखाचा डाव
सोबतीने मांडते...!

रंगीबेरंगी  नाती
नकळत बांधते,
शब्दांच्या खेळातून
संसारात गुंतते...!

मांडतेय  बाजार
ही घरची गृहिणी,
प्रसन्न होऊनिया
लक्ष्मी घरात राणी...!

थकवा ना रुसवा
साद देते मायेची,
दुःखास विसरूनी
जिद्द ठेवी मनाची...!

संसाराच्या व्यापात
शोधें वाट सुखाची,
दुःखाच्या डोहातून
शर्यत जगण्याची...!

नाचे फुलपाखरू
देउनी   घरपण,
तिच्यामुळे हासते
तुळशीवृंदावन...!

------------
श्री.अविनाश लाड
राजापूर-हसोळ
मोब,९९३०६१८३७५ गृहिणी..
गृहिणी...

------------------
हळव्या मनातून
आपलेपणा देते,
सुखदुःखाचा डाव
सोबतीने मांडते...!

रंगीबेरंगी  नाती
नकळत बांधते,
शब्दांच्या खेळातून
संसारात गुंतते...!

मांडतेय  बाजार
ही घरची गृहिणी,
प्रसन्न होऊनिया
लक्ष्मी घरात राणी...!

थकवा ना रुसवा
साद देते मायेची,
दुःखास विसरूनी
जिद्द ठेवी मनाची...!

संसाराच्या व्यापात
शोधें वाट सुखाची,
दुःखाच्या डोहातून
शर्यत जगण्याची...!

नाचे फुलपाखरू
देउनी   घरपण,
तिच्यामुळे हासते
तुळशीवृंदावन...!

------------
श्री.अविनाश लाड
राजापूर-हसोळ
मोब,९९३०६१८३७५ गृहिणी..
avinashlad4153

Avinash lad

New Creator