Nojoto: Largest Storytelling Platform

गझल ...!! वृत्त : राधा लगावली : गालगागा गालगागा ग

गझल ...!!

वृत्त : राधा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा

चांदण्यानी मोडला हा डाव का माझा?
पापण्यांनी बांधला तू घाव का माझा?
**
शब्द माझे होत नाही बावरे ऋतू
काजव्यांनी भारलेला गांव का माझा?
**
ठार झालो आठवांनी या असा मी
वेदनांनी घेतला हा ठाव का माझा?
**
चार ओळी रेखिल्या मी नाच नाचलो
गाव गावा वाढला हो भाव का माझा?
**
का नभांनी आडवावे सागराला ईथे
छेदणारा हो कसा पाडाव का माझा?
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे 
मोबा. ९१५८२५६०५४ ## गझल # वृत्त # राधा ##
गझल ...!!

वृत्त : राधा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा

चांदण्यानी मोडला हा डाव का माझा?
पापण्यांनी बांधला तू घाव का माझा?
**
शब्द माझे होत नाही बावरे ऋतू
काजव्यांनी भारलेला गांव का माझा?
**
ठार झालो आठवांनी या असा मी
वेदनांनी घेतला हा ठाव का माझा?
**
चार ओळी रेखिल्या मी नाच नाचलो
गाव गावा वाढला हो भाव का माझा?
**
का नभांनी आडवावे सागराला ईथे
छेदणारा हो कसा पाडाव का माझा?
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे 
मोबा. ९१५८२५६०५४ ## गझल # वृत्त # राधा ##

## गझल # वृत्त # राधा ##