Nojoto: Largest Storytelling Platform

रविवारी संध्याकाळी बिल्डिंगमध्ये लहानग्यांची चित्र

रविवारी संध्याकाळी बिल्डिंगमध्ये लहानग्यांची चित्रकला स्पर्धा होती.सगळी चिल्लीपिल्ली तुफान उत्साही होती.वय वर्षे तीन ते पाच वर्षांची चिमुकली मुले दिलेलं चित्र रंगवून देणार होती तर इतर मोठी मुले विविध विषयांवर चित्र काढून रंगवून देणार होती.एक रेवा नावाची चिमुकली होती जी शांत बसायला तयारच नव्हती. तिने काय केलं, मोठ्या मुलांच्या गटात जाऊन तिथे गौरी नावाच्या मुलीचा तरी नवा क्रेयॉन्सचा बॉक्स घेऊन आली.मस्त बिनधास्त स्वतःचा क्रेयॉन्सचा बॉक्स बाजूला ठेवून गौरीच्या क्रेयॉन्सने स्वतःच्या चित्रात रंग भरायला सुरुवात केली.गौरी रेवाच्या मागे मागे गेली नाही.तिनं तिच्याकडे जो तुटक्याफुटक्या क्रेयॉन्सचा बॉक्स होता त्याने चित्र पूर्ण केलं आणि तिला बक्षीससुद्धा मिळालं...
खरंच,गौरीला किती समजूतदार होती ! तिचे रंग कुणी घेऊन गेलं म्हणून ती रडत बसली नाही.तिनं आहे त्या रंगांनी आपलं चित्र पूर्ण केलचं नाही तर ती जिंकलीसुद्धा...
हेच महत्वाचं असतं ना आयुष्यात...!
--प्रेरणा #yqtaai #marathiquotes #thoughts #blogger #marathi #marathiwriter