Nojoto: Largest Storytelling Platform

माझी कविता माझी कविता लढते सीमेवरती जवानांच्या न

माझी कविता
माझी कविता 
लढते सीमेवरती 
जवानांच्या निधड्या छातीत 
शत्रूवर झाडलेल्या गोळीत

माझी कविता 
राबते शेतात
शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामात 
डोलणाऱ्या उभ्या पिकात

माझी कविता 
रमते बालपणात
फुलपाखरांच्या मागे 
भातुकलीच्या खेळात 

माझी कविता 
आनंदाने बहरते
प्रियकराच्या प्रेमळ 
गोड सहवासात रमते

माझी कविता 
सुखावते देव्हाऱ्यात
एकाग्र मनात 
प्रांजळ हृदयाच्या गाभाऱ्यात
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 # माझी कविता #
माझी कविता
माझी कविता 
लढते सीमेवरती 
जवानांच्या निधड्या छातीत 
शत्रूवर झाडलेल्या गोळीत

माझी कविता 
राबते शेतात
शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामात 
डोलणाऱ्या उभ्या पिकात

माझी कविता 
रमते बालपणात
फुलपाखरांच्या मागे 
भातुकलीच्या खेळात 

माझी कविता 
आनंदाने बहरते
प्रियकराच्या प्रेमळ 
गोड सहवासात रमते

माझी कविता 
सुखावते देव्हाऱ्यात
एकाग्र मनात 
प्रांजळ हृदयाच्या गाभाऱ्यात
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 # माझी कविता #
vaishali6734

vaishali

New Creator