तु माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे माझ्या कवीतेला लागणारा प्रत्येक शब्द आहेस तू त्या कवितेचा प्रत्येक श्वास आहेस तू बंद पुस्तक वाचणारा 'प्रथम' आहेस तू बंद पुस्तकातले प्रत्येक पान आहेस तू मनी उठणाऱ्या माझ्या भावना आहेस तू त्या भावनांचा दागिना आहेस तू माझ्या कल्पनेचा गाव आहेस तू त्या कल्पनेचा राजकुमार आहेस तू माझ्या जाणिवेचा परिघ आहेस तू त्या परिघात ला मृग आहेस तू माझा 'प्रथम'आहेस तू