Nojoto: Largest Storytelling Platform

जन्म आणि मृत्यूलाही किंमत न राहिली आता जगणे त्या म

जन्म आणि मृत्यूलाही
किंमत न राहिली आता
जगणे त्या मधील ते ही
कुलूपात आले आता

अहंकार तूझा मुबारक
तूलाच मानवा आता
पाहशील एकमेका ते ही
नशीबात न राहिले आता

पैसा जमीन जागा
जागीच राहिले आता
मुक्त विहार करतोय
निर्धन पक्षीच अंबरी आता

पहा नेसून शालू हिरवा
हसते...तूलाच सृष्टी आता
पक्षीही शोधताहेत
कुठे आहेस..मानवा आता

जगतोस ज्या क्षणात
कर सोने क्षणाचे आता
समाधान मिळव अन् प्रेम
सोड आशा उद्याची आता

✍️निशा खरात/शिंदे(काव्यनिश) #Waterfall&Stars
जन्म आणि मृत्यूलाही
किंमत न राहिली आता
जगणे त्या मधील ते ही
कुलूपात आले आता

अहंकार तूझा मुबारक
तूलाच मानवा आता
पाहशील एकमेका ते ही
नशीबात न राहिले आता

पैसा जमीन जागा
जागीच राहिले आता
मुक्त विहार करतोय
निर्धन पक्षीच अंबरी आता

पहा नेसून शालू हिरवा
हसते...तूलाच सृष्टी आता
पक्षीही शोधताहेत
कुठे आहेस..मानवा आता

जगतोस ज्या क्षणात
कर सोने क्षणाचे आता
समाधान मिळव अन् प्रेम
सोड आशा उद्याची आता

✍️निशा खरात/शिंदे(काव्यनिश) #Waterfall&Stars