तू जर मनापासून ठरवलं तर माझं होण्यापासून तुला कुणी अडवणार नाही तू जर असशील आनंदी माझ्यासोबत तर आयुष्य तुला तुझं कधी सतावणार नाही... तू जर मनापासून ठरवलं ना तर कोणतंही कारण आडवं येऊ शकणार नाही तुला जर राहायचं असेल कायम माझ्यासोबत तर जगातील कुणीही तुला अडवू शकणार नाही... तू जर मनापासून ठरवलं ना तर आपण कधीच वेगळे होऊ शकणार नाही आणि जर समजावशील मनाला तुझ्या तेव्हा तर एकत्र कधीच येऊ शकणार नाही... तू जर मनापासून ठरवलं ना, तर आपल्या मधात कधीच कुणी येऊ शकणार नाही आणि हवं च असेल जर कोणतं कारण तर माझ्या दूर होण्यापासूनही तुला कुणी रोखू शकणार नाही.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #happypromiseday love shayari