ए ऐक ना ! कधी तू बेफाम वारा .... कधी तू बेलगाम पावसाच्या धारा .... कधी तू भावनांची तडजोड .... कधी तू मधापेक्षाही गोड .... कधी तू गच्च भरून आलेला ढग ... कधी तू आतल्या आत चाललेली तगमग ... कधी तू असह्य आणि प्रखर .... कधी तू खुणावणारं उंच शिखर .... इतकं अफाट तुझं अस्तित्व .... त्यातही अलिखित तुझी तत्व .... मला कधीच नाही वाचता आली .... याच भीतीने तुझं अस्तित्व स्वीकारण्याची ... मुभा मी मनाला नाही दिली .... तुझं अस्तित्व स्वीकारून .... मी माझ्यासाठी उरणार नाही ... आणि दिली जरी कबुली .... तरी .... तू निर्बंध , स्वछंद , बंधनात ... स्वतःला बंधिस्त करणार नाही .... #love