Nojoto: Largest Storytelling Platform

माझी माय महालक्ष्मी मातापित्यानी दिलेली जपते मोल

माझी माय महालक्ष्मी


मातापित्यानी दिलेली
जपते मोलाची शिकवण
सौख्यभरे नांदायाला 
महालक्ष्मी पाठराखण

जन्मभर कुंकवाची
राहो भरुनी कूयरी
साताजन्माचा सोबती
हाच मिळो या भूवरी

शोडषोपचारे पूजेतून
होई सार्थकी कुळाचार
कुंडलीनी जागृतीने
झाले संस्कार साकार

माय अंबाबाई माझ्या
कल्पतरू गं घराची
सदा जपते आम्हाला
माय माऊली कुळाची

कष्ट करणाऱ्यांपुढे
मांडते ऐश्वर्याची रास 
भूक, तृष्णा मिटवाया
दिला तृप्तीचाही घास

उतू नका मातू नका
म्हणे माऊली विश्वाची 
नित्य स्मरण करूनिया
मिळे संपन्नता जन्माची

स्वप्न साकाराया सारे
तूच फुलवते फुलोरा
माझ्या सांभाळते संपूर्ण
भक्कम घराचा डोलारा

©®सौ.प्रज्ञा कुलकर्णी✍🏻
#राज्ञी # सौ.प्रज्ञा कुलकर्णी# राज्ञी

#navratra
माझी माय महालक्ष्मी


मातापित्यानी दिलेली
जपते मोलाची शिकवण
सौख्यभरे नांदायाला 
महालक्ष्मी पाठराखण

जन्मभर कुंकवाची
राहो भरुनी कूयरी
साताजन्माचा सोबती
हाच मिळो या भूवरी

शोडषोपचारे पूजेतून
होई सार्थकी कुळाचार
कुंडलीनी जागृतीने
झाले संस्कार साकार

माय अंबाबाई माझ्या
कल्पतरू गं घराची
सदा जपते आम्हाला
माय माऊली कुळाची

कष्ट करणाऱ्यांपुढे
मांडते ऐश्वर्याची रास 
भूक, तृष्णा मिटवाया
दिला तृप्तीचाही घास

उतू नका मातू नका
म्हणे माऊली विश्वाची 
नित्य स्मरण करूनिया
मिळे संपन्नता जन्माची

स्वप्न साकाराया सारे
तूच फुलवते फुलोरा
माझ्या सांभाळते संपूर्ण
भक्कम घराचा डोलारा

©®सौ.प्रज्ञा कुलकर्णी✍🏻
#राज्ञी # सौ.प्रज्ञा कुलकर्णी# राज्ञी

#navratra