Nojoto: Largest Storytelling Platform

#कृष्णासम सखा होईन मी तुझा.. सावळे सखे गं रूप तुझे

#कृष्णासम सखा होईन मी तुझा..
सावळे सखे गं रूप तुझे या कृष्णरंगी रंगलेले
मीच राधे तुझा कान्हा मनात तुझीया पूर्ण ठसलेले
या कृष्णास आवडे गोरी तुजसारखी ती राधा
राधेस आवडे तो सावळा शाम रंग
म्हणूनच या जन्मात जन्मलो गतजन्मीचे घेऊन रंग
तू न डोळ्यांसमोर माझ्या नजरेत तरी राहशी सदा
मी न गोप गुंत्यातील कान्हा झुरतेस तरी होऊन राधा
यमुना काठ ना तोच राहिला प्रवाहात आता होई त्रेधा
कधी न व्याकूळ माझी वेणू शमते न तरी बंध क्षुधा
दरी खोऱ्यातून भटकंती वेडी पाऊले न थांबती काळ ज्यादा
न लागे लख्ख प्रकाश मजला रंगतो रास जरी चांद हा आधा
नवखा मी जरी या प्रांती झालीसे जीवा तुझीच बाधा
युगांत प्रितीची आहे अन् तो कृष्णही होता कीर्तीवंत
प्रयत्नांती मी ही होईन तुझ्यासाठी त्या सम मोहन साधा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #कृष्णप्रिया