Nojoto: Largest Storytelling Platform

*फेसाळलेला अथांग सागर* *सांजवेळी कातर होतो* *धीर ग

*फेसाळलेला अथांग सागर*
*सांजवेळी कातर होतो*
*धीर गंभीर आरोळ्यांनी*
*पायखुणा त्या पुन्हा शोधतो..*

*तरल हळवे नितांत सुंदर*
*थवे उतरले निळ्या अंबरी*
*झाकोळलेल्या कुसुमांना मग*
*प्रभा लाभली गर्द केशरी..*

*कुठे सांडला गंध केवडा?*
*दाटून आला आर्त मारवा*
*तार छेडीता नाद प्रसवला*
*खोल उतरला राग केरवा..*

*ढवळून गेला तळ मनाचा*
*हाती गवसले चुकार मोती*
*शिंपल्यात दडलेल्या ओळी*
*ओठांवरती अवचित येती..*

*पंखा वरती नक्षी कोरून*
*स्वैर पाखरे विहार करती*
*उबग येता गगनाचा मग*
*मातीसाठी वणवण फिरती*

©Shankar Kamble #dost #समुद्र #किनारा #काठ #किनारे #सागरलाटा #विचार #मत
*फेसाळलेला अथांग सागर*
*सांजवेळी कातर होतो*
*धीर गंभीर आरोळ्यांनी*
*पायखुणा त्या पुन्हा शोधतो..*

*तरल हळवे नितांत सुंदर*
*थवे उतरले निळ्या अंबरी*
*झाकोळलेल्या कुसुमांना मग*
*प्रभा लाभली गर्द केशरी..*

*कुठे सांडला गंध केवडा?*
*दाटून आला आर्त मारवा*
*तार छेडीता नाद प्रसवला*
*खोल उतरला राग केरवा..*

*ढवळून गेला तळ मनाचा*
*हाती गवसले चुकार मोती*
*शिंपल्यात दडलेल्या ओळी*
*ओठांवरती अवचित येती..*

*पंखा वरती नक्षी कोरून*
*स्वैर पाखरे विहार करती*
*उबग येता गगनाचा मग*
*मातीसाठी वणवण फिरती*

©Shankar Kamble #dost #समुद्र #किनारा #काठ #किनारे #सागरलाटा #विचार #मत