Nojoto: Largest Storytelling Platform

राजकारण... करतात सत्तेसाठी नुसती हाव-हाव शेतकऱ्या

राजकारण...

करतात सत्तेसाठी नुसती हाव-हाव
शेतकऱ्यांच्या मालाला नसे काडीचा भाव
निवडणुका जश्या येतील तोंडी,
करतील प्रचाराची नुसतीच कोंडी

लाखो मतांतून निवडून येते एक नाव 
अन् गुलाल उधळतो गावो गाव
नेता आमचा काही पाच वर्षे टिकेना
जसा ताजा भाजीपाला मार्केट ला विकेना...

अतरंगी राजकारण्यांच्या अतरंगी खेळ्या
मात्र, पोलिस दादांच्या रात्र-दिवस पाळ्या
पडलेत यांचे विक्रमी आघाडीचे गट
अन् नुसतेच करतात एकमेकांवर कट

यांच्या नादात माझा देश पाठी राहतोय
सामान्य माणूस मात्र भरडला जातोय
दूरवर राहिलाय माझ्या देशाचा विकास
इतके 'राजकारण' चाललंय भकास...

©prayag pawar #राजकारण
राजकारण...

करतात सत्तेसाठी नुसती हाव-हाव
शेतकऱ्यांच्या मालाला नसे काडीचा भाव
निवडणुका जश्या येतील तोंडी,
करतील प्रचाराची नुसतीच कोंडी

लाखो मतांतून निवडून येते एक नाव 
अन् गुलाल उधळतो गावो गाव
नेता आमचा काही पाच वर्षे टिकेना
जसा ताजा भाजीपाला मार्केट ला विकेना...

अतरंगी राजकारण्यांच्या अतरंगी खेळ्या
मात्र, पोलिस दादांच्या रात्र-दिवस पाळ्या
पडलेत यांचे विक्रमी आघाडीचे गट
अन् नुसतेच करतात एकमेकांवर कट

यांच्या नादात माझा देश पाठी राहतोय
सामान्य माणूस मात्र भरडला जातोय
दूरवर राहिलाय माझ्या देशाचा विकास
इतके 'राजकारण' चाललंय भकास...

©prayag pawar #राजकारण
prayagpawar4268

prayag pawar

New Creator