अमृत भाषा प्रेमळ भाषा जन्म भाषा। माय मराठी।। ओठांवर असते हृदयी वसते चराचरांत नांदते। माय मराठी।। फुलासारखी बहरते नववधू सारखी नटते जीवनी सुख भरते। माय मराठी। साहित्यातून जन्मते कवितेतून उतरते रसिकांना आपली वाटते। माय मराठी।। लयबद्ध ती कधी नाजूक ती कधी कठोर ती। माय मराठी।। मी मराठी जात मराठी धर्म मराठी। माझी माय मराठी।। नमस्कार मित्रहो, सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा विषय आहे..अमृत भाषा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा