Nojoto: Largest Storytelling Platform

खरा मित्र जगण्यासाठी आसुसलेल्या एकटेपणाने होरपळलेल

खरा मित्र
जगण्यासाठी आसुसलेल्या
एकटेपणाने होरपळलेल्या
प्रत्येक मनाला
सच्चा दोस्त हवा असतो
जीवनाच्या प्रवासात खाच-खळगे येतात तेव्हा
ठेच लागताच सावरणारा
आणि जमिनीवर पाय रोवायला सांगणारा
एक मित्र हवा असतो
अपयशाने खचून जाताच
डोळ्यातले अश्रू टिपणारा
आणि पुन्हा एकदा लढ म्हणणारा
पाठीराखा हवा असतो
पाऊल वाकडे पडताच सावरणारा
ते कर्तव्याची जाणीव करून देणारा
स्वतःच्या सुखाची वजाबाकी करणारा
एक सखा हवा असतो
निस्वार्थ मैत्री ज्याला मिळते
तो भाग्यवान असतो
पण जो निस्वार्थ मित्र बनतो
तो आपल्या सहवासाने
प्रत्येक मनाला फुलवतो #खरा मित्र
खरा मित्र
जगण्यासाठी आसुसलेल्या
एकटेपणाने होरपळलेल्या
प्रत्येक मनाला
सच्चा दोस्त हवा असतो
जीवनाच्या प्रवासात खाच-खळगे येतात तेव्हा
ठेच लागताच सावरणारा
आणि जमिनीवर पाय रोवायला सांगणारा
एक मित्र हवा असतो
अपयशाने खचून जाताच
डोळ्यातले अश्रू टिपणारा
आणि पुन्हा एकदा लढ म्हणणारा
पाठीराखा हवा असतो
पाऊल वाकडे पडताच सावरणारा
ते कर्तव्याची जाणीव करून देणारा
स्वतःच्या सुखाची वजाबाकी करणारा
एक सखा हवा असतो
निस्वार्थ मैत्री ज्याला मिळते
तो भाग्यवान असतो
पण जो निस्वार्थ मित्र बनतो
तो आपल्या सहवासाने
प्रत्येक मनाला फुलवतो #खरा मित्र
monicabora1517

Monica Bora

New Creator