Nojoto: Largest Storytelling Platform

वाचवू भारताला.. ------------------------------- आ

वाचवू भारताला..
-------------------------------

आज सावरु स्वतःला 
   घरच्या रे गोकुळाला
      रांगत्याही बालकांचा
         आज श्वास गुदमरला

नकोय खेळ जीवाचा
   सारी आव्हाने पाळूया
       कैक येतील विषाणू
           धाडसाने पळवूया

रक्षण करू स्वतःचे
   नको सोबत कुणाची
        सहकार्य करू सारे
          लेकरे आम्ही देशाची

न लागो दृष्ट कुणाला
    लाल माझ्या रे रक्ताला
          घेऊया काळजी  सारे
              चला  पळवू रोगाला

देव उभे दिनरात्र
   रूपे आगळी वेगळी
        रक्षण करुनी सारे
           चला वाजवूया टाळी

नको काळजी जीवाला
       सावरु  घर  आमुचे
           पूजा भारत मातेला
               हाल नको ग कुणाचे

थकलेना अहोरात्र
     संकटात  देव -देवी
        नयनी स्वर्ग पाहता
            आयुष्य ज्योत पेटवी

आज सावरु स्वतःला 
     घरच्या रे गोकुळाला
         आव्हाने घेउनी हाती
             वाचवूया भारताला

------------------------------------

@अविनाश लाड,राजापूर-हसोळ वाचवू देशाला...
वाचवू भारताला..
-------------------------------

आज सावरु स्वतःला 
   घरच्या रे गोकुळाला
      रांगत्याही बालकांचा
         आज श्वास गुदमरला

नकोय खेळ जीवाचा
   सारी आव्हाने पाळूया
       कैक येतील विषाणू
           धाडसाने पळवूया

रक्षण करू स्वतःचे
   नको सोबत कुणाची
        सहकार्य करू सारे
          लेकरे आम्ही देशाची

न लागो दृष्ट कुणाला
    लाल माझ्या रे रक्ताला
          घेऊया काळजी  सारे
              चला  पळवू रोगाला

देव उभे दिनरात्र
   रूपे आगळी वेगळी
        रक्षण करुनी सारे
           चला वाजवूया टाळी

नको काळजी जीवाला
       सावरु  घर  आमुचे
           पूजा भारत मातेला
               हाल नको ग कुणाचे

थकलेना अहोरात्र
     संकटात  देव -देवी
        नयनी स्वर्ग पाहता
            आयुष्य ज्योत पेटवी

आज सावरु स्वतःला 
     घरच्या रे गोकुळाला
         आव्हाने घेउनी हाती
             वाचवूया भारताला

------------------------------------

@अविनाश लाड,राजापूर-हसोळ वाचवू देशाला...
avinashlad4153

Avinash lad

New Creator

वाचवू देशाला...