Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आण

मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असावी ? ? 
फुलांच्या बागेसारखी 
सुंदर व मोहक अशी
आसमंत दरवळणारी मैत्री असावी. . . 

त्या मैत्रीच्या बागेची
काळजी घेण्याची तळमळ
प्रत्येकाच्याच काळजात
सदा तेवत असावी. . . 

ज्याप्रमाणे, बागेची प्रेमपुर्वक 
काळजी घेतल्याशिवाय बागेला
सौंदर्य  व मनमोहक बहर प्राप्त होत नाही. . . 

त्याचप्रमाणे, मैत्रीची ही प्रेमपुर्वक
काळजी घेतल्याशिवाय मैत्री
परिपूर्ण होत नाही . . . 

कारण, मैत्री ही बागेतील 
पालापाचोळ्यासारखी असते, 
घट्ट पकडली तर चुरा होते
आणि सैल सोडली तर 
हवेत उडून जाते. . . 

तर मैत्री अशी असावी 
नेहमीच सत्याचा ध्यास घेणारी
सर्वांना आपलेसं  करणारी
पणतीसारखी सर्वांना प्रकाश देणारी. . . 

मला वाटते, 
मैत्री ही तर आरशाप्रमाणे पारदर्शक असावी, कारण. . . 
सर्वांची लपलेली गुपिते फक्त
मैत्रीमुळेच उघडकीस येतात ना. . . 

© रोशन पाटील मैत्री 